पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात होणाऱ्या कॉरिडॉरला स्थानिकांनी विरोध केला आहे.
अधिकाऱ्यांनी वारंवार बैठक घेऊन नागरिकांची समजूत काढली. मात्र, त्याचा फारसा फरक पडलेला नाही. अद्यापही लोकांचा विरोध कायम आहे. त्यामुळे कॉरिडॉर करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कॉरिडॉरच्या विषयावर लोकप्रतिनिधीही बोलायला तयार नाहीत. कारण, नागरिकांना विनाकारण अंगावर कोण घेणार, असे म्हणत राजकीय नेते लांबच राहिले आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेला अनेकांचा विरोध झाला. सर्व्हेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉरिडॉरच्या विषयावर बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यावर ठोस निर्णय घेतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
