मुंबई – नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने पुढील निवडणुकांसाठी हालचाली केल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका पुढील टप्प्यात पार पडणार आहेत. राज्य निवडणूक आयोगात या पुढील निवडणुकांसाठी घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग नवीन प्लॅनवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
नवीन प्लॅन काय?
जिल्हा परिषद-महापालिका निवडणूक एकत्र का?
निवडणुका कधी जाहीर होणार?
राज्यातील २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका येत्या काही दिवसात अपेक्षित आहेत. आज, गुरुवारी राज्य निवडणूक आयुक्तांनी सर्व महापालिका आयुक्तांची बैठक बोलावली आहे. मतदारयाद्यांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. प्रारूप मतदारयादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी बुधवारी संपला आहे. आता अंतिम मतदारयादी तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. ही प्रक्रिया १० डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे महत्त्वाचे म्हणजे ८ ते १४ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे विधानसभा हिवाळी अधिवेशन होत आहे. या काळात कोणत्याही मोठ्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर आयोग कधीही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.
