सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सोलापुरात 9 लाख वाहने आहेत. पण त्यापैकी 2 लाख वाहन धारकांनी HSRP नोंदणी केली आहे. तसेच HSRP नोंदणी करण्यासाठी चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही वाहनधारकांनी नोंदणी करण्यास उदासीनता दाखवली आहे. त्यामुळे आता प्रशासन दंडात्मक कारवाई करण्याची शक्यता आहे.
सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनधारकांची उदासीनता दिसत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी याबाबत महत्त्वाती माहिती दिली. सोलापुरात दुचाकी, चार चाकी, तीनचाकी आणि जडवाहने मिळून एकूण 9 लाख 15 हजार वाहने आहेत. त्यापैकी फक्त 2 लाख 15 हजार 704 वाहन धारकांनी एसआरपी नंबर प्लेट बसवून घेतली आहे. शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2019 च्या अगोदर असलेल्या सर्व वाहनांना एसआरपी नंबर प्लेट बसवून घेणे अनिवार्य केले आहे.आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुरात 1 एप्रिल 2019 च्या वाहनांची एकूण संख्या 9 लाखाच्या वर आहे. त्यामधील फक्त 2 लाख वाहनधारकांनी एसआरपी नंबर प्लेट बसवून घेत आरटीओ कार्यालयाकडे नोंदणी नोंद केली आहे. राज्य शासनाने आजतागायत चार वेळा मुदतवाढ दिली आहे. यंदा 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली नाही तर एसएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर एक हजार रुपये दंड ऑनलाइनरित्या आकारला जाणार आहे.
पाचव्यांदा मुदतवाढ तरीही वाहनधारकांची उदासीनता
महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परिवहन विभागाने नंबरप्लेट बसवण्यासाठी दिलेली ही पाचवी मुदतवाढ आहे. सोलापुरात वाहनधारकांची उदासीनता दिसत आहे. 1 एप्रिल 2019 च्या अगोदरची 7 लाख वाहन धारकांनी उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवून घेतली नाही. परिवहन अधिकाऱ्यांनी वाहनधारकांना आवाहन केले आहे, शासनाने 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यापूर्वी वाहनधारकांनी उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवून घ्यावे.
HSRP नंबर प्लेट म्हणजे काय?
HSRP नंबर प्लेट म्हणजे High-Security Registration Plate. आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी ही नंबर प्लेट महत्त्वाचं असल्याचं परिवहन विभागाचं म्हणणं आहे. कारण नंबरप्लेटमध्ये तशा गोष्टी आहेत. या नंबर प्लेटमध्ये यूनिक लेसर-ब्रँडेड नंबर असतो. या नंबर पल्टेमुळे चोरी झालेल्या वाहनांना शोधणं सोपं होणार आहे. तसेच वाहनांच्या सुरक्षेसाठी ही नंबर प्लेट जास्त महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे या प्लेटवर असं लोकं असतं जे एकदा उघडलं की बंद करता येत नाही. त्यामुळे छेडछाड होऊच शकत नाही.
