पंढरपुरातील एका कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे तीन आमदार एकत्र आले होते. सांगोल्याचे शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील आणि पंढरपूर-मंगळवेढ्याचे भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या भाषणाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. कारण, यावेळी आ. अभिजित पाटील यांनी भाजपचे आमदार आवताडे यांना उद्देशून भविष्यात राजकारणाची नांदी असल्याचे स्पष्ट केले. कारण, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोण-कोणाला मैत्रीचा हात देणार, हे पाहावे लागणार आहे. या साऱ्या घडामोडीकडे परिचारक गटाचे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे पांडुरंग परिवारची भूमिका काय राहणार याची चर्चा सुरू झाली आहे.
