पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त २९ ते ३१ या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दामाजी मेटकरी यांनी दिली.पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले. २९ मे रोजी सकाळी १०:०० वा. मोटारसायकल रॅली मुढवीचे सरपंच महावीर ठेंगील यांच्या हस्ते तर रासप प्रदेश उपाध्यक्ष सोमाआबा मोटे, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती उपाध्यक्ष धनाजी गडदे, चोखामेळा ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी सरगर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अँड. रविकिरण व कोळेकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली.
सकाळी ११ वा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते आमदार समाधान आवताडे होईल. सायं. ७ वा. हभप ज्ञानेश्वर तुकाराम वासकर महाराज, पंढरपूर यांचे कीर्तनाचे उद्घाटन माजी आ. प्रशांतराव परिचारक, दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील, धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, भैरवनाथ शुगर्सचे अनिल सावंत, राहुल शहा यांच्या उपस्थितीत होणार आहेत. ३० मे रोजी स. ९ वाजता रक्तदान शिबिर, सकाळी ११:०० वाजता धनगरी ओव्यांच्या कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७:०० वाजता नाद भारुडाचा सादरकर्ते भारुड सम्राट दादा मेटकरी आणि सहकारी, फटेवाडी यांच्या भारुडाचा कार्यक्रम आहे. ३१ मे रोजी दुपारी ३:०० वा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीच्या मिरवणुकीचे उद्घाटन दामाजी शुगर्सचे उपाध्यक्ष तानाजी खरात यांच्या हस्ते होणार आहे.
