पंढरपूर गेली काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने सामवारी भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने पंढरपुरातील दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन महाराज मंडळी अचानक पाण्याची पातळी वाढून पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नदीपात्रात अडकली होती. गाबाबत ग्रामस्थांच्या मार्फत प्रशासनाला माहिती मिळताच आपाती व्यवस्थापन पथकाकडून तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु करून स्थानिक होडी चालकांच्या मदतीने नदीपात्रात अडकलेल्या सुभाष उवन, विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज या तीन महाराजांची सुखरूप सुटका केली आहे. सोमवार असल्याने गुरसाळे येथील भीमा नदीच्या पात्रात असलेल्या महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी सकाळी तीन महाराज मंडळी गेले होती.
