इस्रायलने भारताच्या निबे लिमिटेड कंपनीसोबत १७.५ कोटी डॉलर्स म्हणजेच १५० कोटी रुपयांचा रॉकेट लाँचर करार केला आहे. NIBE ही देशातील एक आघाडीची कंपनी आहे जी महत्त्वाच्या संरक्षण प्रणालींचे उत्पादन करते. त्यांनी इस्त्रायलकडून मिळालेल्या या खरेदी ऑर्डरची घोषणा केली आहे.
खरे तर ही एक छोटी ऑर्डर आहे. मात्र हिचे महत्व फार मोठे आहे. जर इस्रायलसारखा देश भारताच्या शत्रांवर विश्वास दाखवत असेल, तर जगभरात भारताच्या शखांवरील विश्वास वाढेल आणि येणाऱ्या काळात त्याचा व्यापक परिणाम दिसून येईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये, भारतीय सैन्याने मोठे शौर्य दाखवले आणि काही तासांतच पाकिस्तानी हवाई दलाचे कंबरडे मोडले. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये ७० टक्क्यांहून अधिक स्वदेशी
शस्त्रे वापरली आणि काही तासांतच पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पडले. पाकिस्तानची सर्व चिनी शस्त्रे निष्प्रभ झाली. या कारवाईनंतर भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र, आकाश संरक्षण प्रणाली आणि इतर शत्रांना जागतिक मान्यता मिळाली आहे.
जगात दहशतवादाची सर्वाधिक झळ सोसलेला आणि सोसत असलेला इस्त्रायल आता भारताकडून शस्त्रास्त्रे खरेदी करणार आहे. इस्त्रायल हा एक असा देश आहे, ज्याला इस्लामिक जग आपला सर्वात मोठा शत्रू मानते. हा तोच इस्रायल आहे जो गेल्या महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताच्या बाजूने उभा राहिला होता.
