संरक्षण मंत्रालयाची घोषणा |
शस्त्रास्त्राच्या बाबतीतआत्मनिर्भर होण्याचा भारताकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या स्वदेशी शक्तीला संपूर्ण जगाने पाहिले आहे. आता भारताने स्वदेशी जेट बनवण्याची तयारी सुरू केली आहे. पाचव्या पिढीच्या जेटला उन्नत असे नाव देण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने फायटर प्लेनचे पहिले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याचे नाव उन्नत मध्यम लढाऊ विमान असे ठेवण्यात आले आहे. पाचव्या जनरेशनचे हे विमान असेल. हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी डीआरडीओकडे सोपवण्यात आली आहे. डीआरडीओने यापूर्वीही असे असंख्य स्वदेशी शस्त्र तयार केले होते. तसेच हे शस्त्र बनविण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरीही दिली आहे. याबाबत माहिती देताना संरक्षण मंत्रालयाने भारत स्वदेशी संरक्षण क्षमता वाढविण्यासाठी आणि देशांतर्गत मजबूत एअरोस्पेस औद्योगिक तंत्राला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केला आहे, असे म्हटले आहे तर उन्नत मध्यम लढाऊ विमान कार्यक्रम निष्पादन मॉडेलला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली. एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी उद्योग भागिदारीच्या माध्यमातून कार्यक्रम क्रियान्वित करण्यासाठी तयार आहे. हे एएमसीए प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी स्वदेशी विशेषज्ञता, क्षमता आणि सामर्थ्यांचा उपयोग करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे एअरोस्पेस क्षेत्रात आहे. आत्मनिर्भरतेच्या दिशेने मैलाचा दगड ठरणार
स्टिल्थ तंत्रज्ञान ठरणार फायद्याचे
एअरोनॉटिकल डेव्हल्पमेंट एजन्सी (एडीए) ही डीआरडीओच्या अंतर्गत काम करते. आता या योजनेचे नेतृत्व करत आहे. एडीएने खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसोबत भागिदारीच्या माध्यमातून या योजनेला गती देण्याची योजना तयार केली आहे. स्वदेशी संरक्षण उद्योगात रोजगार सृजन आणि आर्थिक विकासालाही प्रोत्साहित करेल. एएमसीएच्या प्रोटोटाइपच्या विकासासाठी स्वदेशी तज्ज्ञ आणि उन्नत तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. यात स्टिल्य तंत्रज्ञान, सुपरक्रूज क्षमता, उन्नत सेन्सर आणि शख प्रणाली असणार आहे. त्यामुळे देशाच्या शख सज्जतेला मोठा फायदा होणार आहे.
