करमाळा -आमदार नारायण आबा पाटील यांनी नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन प्रत्यक्षात पिक पाहणी केली असुन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दोन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी शासनाकडे मागणी केल्याचे सांगण्यात आले. करमाळा मतदार संघात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गेले दोन आठवडे झाले पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. यामुळे आमदार नारायण आबा पाटील यांनी दिवसभर नुकसानग्रस्त भागात गावभेट दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत तालूका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी मधुकर मारकड, कृषी सहायक बाबुराव बेरे, कृषी सहायक नितीन रांजून, कृषी सहायक सुप्रिया शेलार, कृषी सहायक राहुल गव्हाणे, कृषी सहायक सचीन सरडे, सभापती अतुल भाऊ पाटील, उपसभापती दत्तात्रय सरडे, आदिनाथ माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, आदिनाथ संचालक हनुमंत सरडे, विजयराव कोकरे, अजित ननवरे, कैलास बोंदरे आदि उपस्थित होते.
नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना आ. नारायण पाटील व अन्य.
या दौऱ्यात शेटफळ येथील शेतकरी रंगनाथ पोळ, मुकुंद पोळ, विजय रामचंद्र लबडे, अनिल प्रल्हाद पोळ तर चिखलठाण येथील शिवाजी नारायण जगताप, कुगाव येथील बळीराम जनार्दन सरडे, प्रशांत लक्ष्मण कामटे आदि शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या केळी, डाळींब, उडीद, कांदा आदि पिकांची प्रत्यक्षात पाहणी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधुन दिलासा दिला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नुकसानीचे अहवाल तयार करुन वरीष्ठ कार्यालयात ते सादर करावेत अशा सुचना दिल्या.
