राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा अजित पवार यांची केंद्र सरकारच्या महिला सशक्तिकरण विषयक संसदीय समितीवर निवड झाल्यानिमित्त ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ईच्छा भगवंताची मित्रपरिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव यांनी खासदार सुनेत्रावहिनी यांना शाल पांघरून पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाअध्यक्षा वर्षाराणी शिंदे, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक सुरेश पालवे, सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, शहर सरचिटणीस संतोष गायकवाड, महादेव राठोड, आनंद गाड-`कर आदींची उपस्थिती होती. यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले.
