पंढरपूर -श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात आलेल्या दान पेटीत आलेली भाविक श्रद्धेपोटी पैसे व मौल्यवान वस्तू टाकतात. मात्र या दानपेटीतील पैशाचा गैरव्यवहार घोटाळा झाल्याचा संशय युवा सेनेचे शहराध्यक्ष सुमित शिंदे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत पुढील आठ दिवसात मंदिर समितीने लेखी खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन मंदिर समिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना दिले नदिर आहे. याप्रसंगी युवा सेनेचे शहराध्यक्ष सुमित शिंदे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख तानाजी मोरे, संतोष बंडगर उपस्थित होते. या प्रकरणी चौकशी करून यामध्ये कोणी कर्मचारी दोषी आढळल्यास यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पंढरपूर युवा सेनेचे शहराध्यक्ष सुमित शिंदे यांनी मंदिर समितीला दिला आहे.
समितीने खुलासा म्हणून खिली जात. कारये करण्याची केली मागणी दररोज लाखो भाविक श्री. विठ्ठल पंढरपूर हे दक्षिण रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. ते मंदिरातील दानपेटीत पैसे व इतर मौल्यवान वस्तू दान करतात. परंतू त्या दान पेटीतील पैशाचा गैरव्यवहार झाला असल्याबाबतचा आणि यामध्ये मंदिरे समितीमधील काही कर्मचारी सामील असल्याचा संशय युवा सेनेकडून निवेदनात व्यक्त केला आहे.
