पंढरपूर-पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे फळबागा व पिकांचे नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांना आर्थिक करुन मदत मिळावी. तसेच मागील वर्षी गारपीट झालेल्या शेतकऱ्यांनाही अनुदानाची रक्कम मिळावी, अशी मागणी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्यणराव काळे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचेकडे केली आ हे. त्याची दखल घेऊन तात्काळ पंचनामा व मदतीची सूचना संबंधीत विभागाकडे देण्यात आल्या.कृषी मंत्री श्री विठठल रुक्मिणी दर्शनाकरीता आले असता काळे यांच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी काळे यांनी त्यांना ही मागणी केली. कोकाटे यांचा सत्कार चेअरमन कल्याणराव काळे यांनी केला.
पंढरपूर तालुक्यात माहे मे 2024 मध्ये अवकाळी पाऊसामुळे व गारपीठ यामुळे झालेल्या शेतपिकांचे व फळपिकांची नुकसान भरपाई अद्याप पर्यंत शासनाकडून प्राप्त झालेली नाही ती जमा व्हावी. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023-24 1.36 कोटी, 2024-25-1.35 कोटी, भाऊसाहेब फुं-डकर फळबाग लागवड योजना 2023-24-4.88 कोटी 2024-25 6.99 कोटी, व महात्मा गांधी रोजगार हमी योजना 2023-24-49 लाख रूपये. इ. योजनेचे अनुदान प्रलंबित आहे. तेही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, अशी मागणी काळे यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेश उपाध्यक्ष, समाधान काळे, सोलापूर जिल्हा महिला काँग्रेसच्सा अध्यक्षा वर्षा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक, शहर अध्यक्ष दिगंबर सुडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण शिंदे, अर्जुन जाधव, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन भारत कोळेकर, संचालक मोहन नागटिळक, राजुबापू पाटील, अमोल माने, सुरेश देठे, दिनकर कदम, विक्रम बागल, अरुण नलवडे, राजा माने, बाळू माने, जयसिंह देशमुख, शंकर चव्हाण महाराज, परमेश्वर लामकाने, ज्योतीराम पोरे, सुभाष बागल, तुकाराम झांबरे, महादेव देठे, बाळू शिंदे, अंकुश चव्हाण, योगेश जाधव, सचिन पवार सी.पी. बागल, सतिश नागणे, नारायण कदम यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
