तवर्षीच्या तुलनेत ८० टक्के अधिक पाणीसाठा; १२ हजार विसर्ग सुरू लोकमत न्यूज नेटवर्क अवकाळी पाऊन थांबल्याने उजनी धरणात येणाऱ्या दौंड विसर्गात मोठी घट झाली असून, दौंड येथून १२ हजार ११८ क्युसेक विसर्ग उजनी धरणात सुरू असून धरणाची पाणी पातळी २० टक्के झाली आहे. धरणात एकूण ७४ टीएमसी झाला आहे, तर १०. ३४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या दहा ते ११ दिवसांपासून उजनी धरणाची पाणीपातळी वाढत आहे. मान्सून पूर्व जोरदार अतिवृष्टी झाल्याने दौंड येथील विसर्ग ३५ हजार क्युसेकपर्यंत गेला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दौंड विसर्गात बुधवारपासून घट होत गेली आहे. बुधवारी सायंकाळपासून गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत गतवर्षी ३० मे रोजी दुष्काळामुळे उजनी धरणाची पाणीपातळी वजा ५९.४९ टक्क्यापर्यंत खाली गेली होती. ३१.७९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता, तर ९ जून २४ पासून उजनी धरणाची पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाली होती. यावर्षी गतवर्षीपेक्षा ८० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीपातळी आहे. सध्या धरण २० टक्क्यांपर्यंत गेले आहे.
गेल्या २४ तासांत देखील ५ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पाऊस स्थिरवला असल्याने उजनीची वाटचाल संथगतीने पुढे सरकणार आहे. उजनी धरण शंभर टक्क्याच्या जवळ गेल्यानंतर आडसली ऊस लागवडीस वेग येतो. शंभर टक्के भरल्यानंतर शेतकरी वर्षभर समाधानी असतो. भीमा-सीना जोड कालव्यातून सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात आले आहे. गेल्या ११ दिवसांत ४३ टक्के पाणीपातळी वाढली असून २३ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
