सांगोला सांगोला आगारात नवीन ५ एसटी बस दाखल झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आगारासाठी नवीन २० एसटी बसची मागणी शिंदेसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्र्यांनी बसगाड्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. पहिल्या टप्प्यातील ५ आधुनिक बीएस-६ श्रेणीतील बसगाड्या सांगोला आगारात दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आरामदायक होणार आहे.
