मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतली आषाढी यात्रा पूर्वतयारीची बैठक
पंढरपूर- वाखरी (ता. पंढरपूर) येथे सर्वच पालखी सोहळे एकत्र येत असतात. या ठिकाणी येणाऱ्या सर्व पालकांना योग्य सोयी-सुविधा मिळाव्यात, यंदाच्या वर्षी शक्य नसले, तरी पुढच्या वर्षी या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा युक्त पालखीतळ मॉडेल तयार व्हावे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिली. आषाढी यात्रेच्या पूर्व नियोजनाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विभागीय आयुक्त, मनाच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख सोहले सोलापर व पणे जिल्हाातील अधिकारी उपस्थित होते.
आषाढी यात्रेत आता ज्या सुविधा देत आहेत, त्या सुविधा देण्यात याव्यातच. परंतु ज्या तत्काळ सुविधा पुरवणे शक्य नाही अशा सूचना घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर यंदा पाऊस असल्याने वॉटरप्रूफ मंडप अधिक प्रमाणात वाढवावे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी मुरमीकरण करण्यात यावे. प्रमुख पालखीतळाच्या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात यावी. कालच्या परत जाताना पोलिस बंदोबस्त मिळावा यात्रा कालावधीमध्ये लाखो भावी पंढरपूरमध्ये असतात, यामुळे पंढरपूर शहर स्वच्छ राहण्यासाठी शौचालयाची संख्या वाढवण्यात यावी. ६५ एकर परिसरातील काही जागा कायमस्वरूपी मिळावी, अशी मागणी मुक्ताई पालखी प्रमुखांनी केली. वाखरी पालखी तळावर सर्व पालख्या एकत्र येतात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत कक्ष उभे केले जातात. या स्वागत कक्षामुळे भाविकांना अडचण निर्माण होते. पालख्यांना पंढरपुरात जाताना उशीर होतो. यामुळे स्वागत कक्षांची संख्या कमी व्हावी, अशा सूचना पालखी प्रमखांनी मांडला आहेत.
इतर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील घ्यावी नियोजन बैठक
सोलापूरमध्ये आल्यानंतर आम्हाला सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होतात. परंतु, येताना नाशिक, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांत सुविधा मिळत नाहीत. यामुळे या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रा पूर्व नियोजनाची बैठक घेऊन आमच्या सूचना ऐकून घ्याव्यात, अशी मागणी रुक्मिणी माता संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
