सांगोला : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती महोत्सव समिती आणि धनगर समाजसेवा मंडळातर्फे वक्तृत्व स्पर्धा, शैक्षणिक साहित्य वाटप, पोवाडा, धनगरी ओव्या आदी कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष देविदास गावडे यांनी दिली.
गुरुवार, दि. २९ मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वक्तृत्व स्पर्धा, धनगरी ओव्या, गाथा अहिल्यादेवीची आपल्या संस्कृतीची कार्यक्रम पार पडला. शुक्रवार, दि. ३० मे रोजी काशिलिंग आणि विकार मंडळ धायटी श्री अंबिका ओविकार मंडळ सांगोला यांचा धनगरी ओव्याचा कार्यक्रम, शाहीर गंधर्व, देवानंद माळी व शाहीर पृथ्वीराज माळी संच सांगली यांचा राजमाता अहिल्यादेवी जीवन गाथा पोवाडा, दुपारी ३ वाजता समाज प्रबोधन व मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, सायंकाळी ७ च्या सुमारास विद्युत रोषणाईसह लेजर शो व शोभेचे दारूकाम होणार आहे.
शनिवार, दि. ३१ मे रोजी सकाळी ९ वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व महाआरती, सकाळी ९:३० वाजता भव्य रॅली, दुपारी १२ वाजता धनगरी ओव्याचा कार्यक्रम, सायंकाळी ४ वाजता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेची सांगोला शहरातून हत्ती, उंट, घोडे, केरळ येथील कलारूपम थैय्यम, चंडी व कावडी डान्स, हलगी ग्रुप, न्यू नॅशनल बँड, शोभेच्या दारूकामासह शोभायात्रा आयोजित केल्याचे मंडळाचे अध्यक्ष देविदास गावडे, उपाध्यक्ष अरुण कोळेकर, सचिन गावडे, योगेश लवटे, निशांत मिसाळ, खजिनदार माळाप्पा शिंगाडे, सहखजिनदार संदीप कोळेकर, सचिव अण्णासाहेब मेटकरी, सहसचिव प्रवीण कोळेकर यांनी सांगितले.
