आवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मंत्री बावनकुळे शासनाकडे अहवाल यांना पाठवावा, अशी मागणी आमदार राजू आ. राजू खरे खरे यांनी महसूल यांचे निवेदन मंत्री नकुळे बाशशेखर केली आहे. गुरुवारी बावनकुळे हे सोलापुरात आले असताना त्यांनी जिल्हयातील सर्व आमदार आणि अधिकारी यांचे समवेत बैठक घेतली होती. यावेळी आ. खरे यांनी आपल्या मोहोळ मतदार संघातील शेतकऱ्याचा प्रश्न मांडला. यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे सुरु करण्याचे आदेश दिले. आवकाळी पावसामध्ये जिरायती पिकांसह बागायती पिके यांचे नुकसान झाले आहे. अनेक जनावरेही दगावली आहेत. त्यांचेही त्वरित नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने पावले उचलावेत, असे आ. खरे यांनी यावेळी सांगितले.
आ. अभिजीत पाटील, आ. बाबासाहेब देशमुख, आ. नारायणआबा पाटील, आ. उत्तम जानकर, रणजीतसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचेसह आमदार आणि विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
