कधी सुरू होणार असे म्हणता म्हणता सोलापूरची विधानसभा 9 जून पासून सुरू होत आहे. त्याला सोलापूर करांकडूनही मोठ्या प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. पाच सहा वर्षांपासून सोलापूरची विमानसेवा हा प्रश्न गाजत आहे. सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यापासून तर काही लोकांकडून सोलापूरची विमानसेवा सुरू होत नसल्याबद्दल राज्य सरकारला टोमणे मारले जात होते. त्या पार्श्वभूमीवर फ्लाय 91 या कंपनीतर्फे 9 जून पासून सोलापूर ते गोवा अशी विमानसेवा सुरू होत आहे. त्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह 15 मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे समजते आहे. परिणामी पहिल्या दिवशी 72 आसनी असलेल्या या विमानात
जवळपास 15 सीट आरक्षित ठेवल्याचे समजते आहे. पहिल्याच दिवशी सोलापूरकरांच्या प्रचंड प्रतिसादामुळे साडेतीन हजार रुपयाचे तिकीट साडेआठ हजारापर्यंत उच्च दरावर विकले गेले. पहिल्याच दिवशी दिवशी विश्वराज एव्हीएशन या एजन्सीने पंधरा जणांचे तिकीट बुकिंग केली आहे. त्यानंतर चार दिवसानंतरही 20 जणांचे बुकिंग केले आहे. त्याच्या पुढच्या चार दिवसांसाठी ही 1500 बुकिंग केल्याचे विश्वराज एव्हिएशन या एजन्सीने सांगितले.
सोलापूरच्या विमानसेवेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची लक्षणे दिसत आहेत. असाच प्रतिसाद जर वारंवार दिसला तर लवकरच सोलापूर ते मुंबई विमान सेवा सुरू होईल अशी आशा निर्माण झाली आहे. सोलापूर ते मुंबई अशी विमान सेवा सुरू झाल्यास त्यामुळे सोलापूरच्या औद्योगिकरणाला वेग येईल अशी शक्यता आहे.
