सेवानिवृत्त शिक्षिकेला ८३ लाखांना गंडविले
अंबाजोगाई – अंबाजोगाईत एका सेवानिवृत्त शिक्षिकेला व्हॉट्सअप कॉलवरून ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचा प्रकार घडला आहे. सेवानिवृत्त शिक्षिकेला मनी लॉड्रिंग आणि अतिरेक्यांना फंडिंग केल्याचे सांगत तब्बल ८३ लाख रुपयांना गंडवण्यात आले. चौकशीला सहकार्य करा असे सांगत फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेत ही फसवणूक केली.
