सांगोला – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा सांगोला, नगर वाचन मंदिर, लायन्स क्लब, रोटरी क्लब व सांगोला अर्बन को-ऑप बँकेतर्फे सोमवार दि. २ जून रोजी सायंकाळी ५ वाजता सांगोला अर्बन बँकेच्या सभागृहात निमंत्रित कवी, कवयित्रींचे कविसंमेलन रं. ता. चोरमुले (जुनोनी/मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अविनाश सांगोलेकर (पुणे) उपस्थित राहणार आहेत. या कविसंमेलनात शिवाजी बंडगर, राधिका प्रेमसंस्कार, तानाजी वाघमारे, साबळे गुरुजी, ना. मा. कांबळे, संतोष जगताप, अॅड. उदय दौंडे, दमयंती कुलकर्णी, पुष्पलता मिसा मिसाळ, सुशीला नांगरे-पाटील, योजना मोहिते, मनीषा ठोंबरे, हर्षदा गुळमिरे, सुवर्णा तेली, अनिल केंगार, गौसपाक मुलाणी, गीता गुळमिरे, आश्लेषा मोदी, सुप्रिया कांबळे, जान्हवी सावंत, सीमा गायकवाड, सुरेखा कुलकर्णी, जयश्री पाटील, तेजश्री बाबर, प्रज्ञा देशपांडे, विद्या शिर्के, सावित्री बाबर, बशीर तांबोळी, सुनील जवंजाळ कविता सादर करणार आहेत.
