सोलापूर – पंधरा-वीस दिवसापासून दिवसांपासून शहर पाणी पुरवठा नियोजनाचे काम सोलापूर महानगर पालिकेकडून विस्कळीत होत आ-हे. त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे सोमवारी दि दोन जून रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. प्रभाग १ च्या वतीने चार हुतात्मा चौक परिसर ते सोलापूर महानगर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे हा मोर्चा यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. चार हुतात्म्यांना अभिवादन करून मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आला. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सोलापूर महानगर पालिकेचा धिक्कार असो, आयुक्त साहेब होश में आओ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
या प्रसंगी संतोष पवार, सुजित अवघडे, शोभा सोनवणे यांनी राज्यात महायुतीचे स रकार अतिशय चांगले काम करीत असताना स्थानिक पातळीवर सोलापूर महानगर पालिकेच्या प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका सोलापूरकरांना बसत आ हे. त्या विरोधात महापालिकेला वठणीवर आणण्यासाठी हा मोर्चा काढल्याचे सांगितले.याप्रसंगी जनरल सेक्रेट री प्रमोद भोसले, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, प्रज्ञासागर गायकवाड, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर यांच्यासह प्रभाग १ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
