केंद्र सरकारने आज पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार संसदेचे या वर्षाचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून चालू होणार आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली. येत्या २१ जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होईल. हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर शासकीय नियमाअंतर्गत चर्चा होणार आहे. तीन महिन्यांच्या विरामानंतर संसदेच्या दोन्ही सत्रांचे अधिवेशन २१ जुलैपासून चालू होईल. २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता अधिवेशनाला सुरूवात होईल.
