तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने देवी भाविकांना आता मोतीचुर लाडूचा प्रसाद वाटप केला जाणार आहे. यासाठी पुण्याचे सुप्रसिद्ध मिठाईदार चितळे बंधुशी करार करण्यात आला आहे. श्री तिरूपती बालाजी, शिर्डी साईबाबा देवस्थानच्या धर्तीवर मोतीचुर लाडू प्रसाद म्हणून देवी दर्शनानंतर भक्तांना मिळणार आहे. श्री तुळजाभवानी संस्थानने या बाबतीत स्थानिक पुजारी वृदांशी चर्चा करुन प्रसाद म्हणून मोतीचुर वाटप करण्याचा निर्णय घेतला. यापुर्वी ही मंदिरात् प्रसाद म्हणून लाडू वाटप केले जात होते. कालांतराने ते बंद झाले. त्यानंतर पुजारी मंडळाशी चर्चा करुन अखेर मोचीचुर लाडू भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्याचा निर्णय झाला. पुण्याचे सुप्रसिद्ध मिठाईवाले चितळे बंधुशी अखेर करार करण्यात आला. या निर्णयाचे भक्तांमधुन स्वागत होत आहे.
