पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या ६०.८ लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या ५९ लाखांवर होती. तर, चीनमध्ये पाकिस्तानी गाढवांच्या कातडीची आणि मासांची मागणी सतत वाढत आहे. चीनमध्ये गाढवांच्या कातडीचा वापर करून पारंपरिक औषधे बनवली जातात. त्यामुळे चीन पाकिस्तानकडून गाढवांची खरेदी करत आहे. पाकिस्तानमध्ये गाढवांच्या संख्येत सलग तिसऱ्या वर्षी वाढ झाली आहे. चीनमधील पारंपरिक हर्बल औषधांमध्ये गाढवाचा वापर केला जातो. गाढवाच्या कातडीपासून बनवलेले इजियाओ नावाचे औषध त्वचा, रक्त, पुरूषांचे लैंगिक आरोग्य आणि प्रजनन आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. गाढवापासून बनणारे हे औषध अतिशय महागडे असून, श्रीमंत वर्गात अतिशय लोकप्रिय आहे.
