पंढरपूर – आमदार चेअरमन अभिजीत पाटील यांनी शब्द पाळाला . श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामधील निवृत्त कर्मचारी व व्यापाऱ्यांनी थकीत रक्कम मिळावी. या मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. यामध्ये तडजोड झाली असून कारखान्याने कर्मचाऱ्यांना ५० टक्के रक्कम देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. शासनाने विठ्ठल कारखान्याला ३४७ कोटी रुपयाचे कर्ज दिले होते. यामध्ये कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी ४१ कोटी व व्यापाऱ्यांची देणी देण्यासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र मागील संचालक मंडळाच्या काळात कारखाना बंद अवस्थेत असल्याने नवीन संचालक मंडळाला कारखाना सुरू करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. यामुळे कारखाना मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला होता. गेल्या अनेक महिन्यापासून कारखान्याने थकित रकमा देण्यास विलंब लागला होता. यामुळे निवृत्त कर्मचारी व व्यापारी संतप्त झाले. त्यांनी पुणे येथील साखर विठ्ठल कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी.आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले. दरम्यान कारखान्याने तडजोड केली व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ५० टक्के रक्कम देण्याचे मान्य केले. त्यानुसार कारखान्याकडून कर्मचाऱ्यांना रक्कम वाटप करण्यास सुरुवात झाली आ हे. कारखान्याने या अगोदर कर्मचाऱ्यांना २५ टक्के रक्कम दिली आहे. आता ५० टक्के रक्कम देण्यात आली आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना ७५ टक्के रक्कम मिळाली आहे. उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन चेअरमन आमदार अभिजीत पाटील यांनी दिले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामुळे पुणे येथे उपोषणास बसलेल्या इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केले आहे. आमदार अभिजीत पाटील यांनी कारखाना निवडणुकीत पॅनल उभा केल्यावर शेतकरी, कर्मचारी व व्यापाऱ्यांची देणी देण्यात येतील, असा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी तो शब्द पळाला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गणांचा आढावा
