पंढरपूर – आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद सोलापूर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आ-है. दहा पालखी मार्गांवरील १०७ठिकाणांचा टँकर भरण्यासाठी आढावा घेतला आहे. पालखी मार्गावर वारकऱ्यांना पाणीपुरवठ्यात अडचण येऊ नये, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पंढरपूर येथे नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. त्याच्या आढावा बैठकीत एकूण १० पालखी मार्गावरील टँकर भरणेच्या एकूण १०७ठिकाणचा आढावा घेऊन १४२ अधिकारी व कर्मचारीऱ्यांची नियुक्ती केली आहे. सदर आढावा प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, उप कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, रविंद्र करजगी, सर्व उपकार्यकारी अभियंता उपस्थित होते. संत सोपानकाका महाराज पालखी मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी ०५, संत गजानन महाराज पालखी महाराज मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी १०, संत मुक्ताबाई पालखी मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी ०८, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी ०५, संत एकनाथ महाराज पालखी मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी ०४, संत निळोबाराय महाराज पालखी मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी ०५, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी (पंढरपूर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर) मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी ४७, चांगावटेश्वर महाराज मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी ०६, कौडण्यपूर विदर्भ पालखी मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी ०६, नियंत्रण कक्ष पंढरपूर येथील नियुक्त अधिकारी व कर्मचारी -०५ असे कर्मचारी असणार आहेत.
प्रमुख दोन पालखी मार्गावरील कर्मचारी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी – २९, संत तुकाराम महाराज मार्गावरील पालखी नियंत्रण अधिकारी व कर्मचारी १२
