पंढरपूर – सध्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. अशातच सकाळी व संध्याकाळी मंदिर समितीकडून तुळशी पूजा केली जात आहे. या पूजेमुळे दर्शन रांग ही एकाच जागेवर थांबते. परिणामी, लांबून आलेल्या भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत आठ ते दहा तास ताटकळत राहावे लागते. वेळेत दर्शन व्हावे, यासाठी तुळशी पूजा बंद करावी, अशी मागणी वारकऱ्यांतून होत आहे. पंढरपूरच्या सावळ्या विठूरायाची नित्य पूजा, तुळशी पूजा, पाद्य पूजा, चंदन उटी आदी प्रकारच्या पूजा भाविकांच्या हस्ते केल्या जातात. या पूजांमध्ये बराचवेळ जातो. तर पूजा सुरू असताना भाविकांना दर्शनासाठी सोडले जात नाही. दरम्यान, या पूजांमुळे दर्शन रांगेतील भाविकांना ताटकळत उभे राहावे लागते. दोन दिवसांपूर्वी अधिकवेळ दर्शन रांगेत उभे राहावे लागल्याने भाविक संतप्त झाले.
मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी
सध्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. अशातच सकाळी व संध्याकाळी मंदिर समितीकडून तुळशी पूजा केली जाते. या पूजेसाठी बराचवेळ जातो. यामुळे दर्शन रांग रखडली. दर्शन रांगेत आठ ते दहा तास थांबावे लागल्याने भाविकांनी मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी केली
