नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ दिले जाणारे ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १४ जून २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत.
