सोलापूर – पालकमंत्र्यांनी आमदार देवेंद्र यांना फोनवरून दिली माहिती .येत्या ९ जूनपासून फ्लाय नाईन्टी वन या कंपनीची सोलापुरातून गोव्याला विमानसेवा सुरू होणार आ हे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांमध्ये आनंदाची भावना असतानाच आता येत्या १ ऑगस्टपासून मुंबईलाही विमान सेवा सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. आमदार देवेंद्र कोठे यांच्याशी फोनवरून बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सोलापूर-गोवा विमानसेवेच्या उद्घाटनासाठी ९ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे येणार आहेत, अशी माहितीही पालकमंत्र्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री मुंबई विमानसेवेची घोषणा करतील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सोलापुरात शुक्रवारी कौशल्य रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा आले होते. त्यांनी नियोजन भवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर पत्रक ारांशी आमदार देवेंद्र कोठे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोलापूरच्या विमान सेवेबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी फोनवरून संभाषण केले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. विमान सेवेसाठी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्यापासून वाद वाढला होता. लोकसभा निवडणुकीत तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याबाबत भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले होते. मात्र, त्यानंतर अनेक दिवस चाचणी विमान उड्डाणे होत होती. मात्र विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यशानंतर विमानसेवेच्या कामाला वेग आला. अखेर राज्य सरकारने ९ जून पासून सोलापूर ते गोवा विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली. आता पहिल्या काही दिवसांची बुकिंग फुल झाली आहेत.
सोलापूरकरांची होणार सोयआता ऑगस्ट महिन्यापासून फ्लाय नाईन्टी वन याच विमान कंपनीकडून मुंबईलाही सेवा सुरू केली जाणार आहे, असे सांगण्यात येत आहे. गोव्या पाठोपाठ मुंबईलाही विमानसेवा सुरू झाल्यास सोलापूरचा ठप्प पडलेला विकासाचा वारू वेगाने उधळणार आहे.
