शैक्षणिक क्षेत्रात भारताने चीनला दोन बाबतीत मागे टाकले आहे. कौतुकाची बाब म्हणजे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर घडले आहे. जगात सर्वाधिक पदवीधर असलेल्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर तर दुसऱ्या क्रमाकांवर अमेरिका आहे. जागतिक बँकेच्या २०२३ च्या रिपोर्टमध्ये हे म्हटले आहे. जगात सर्वाधिक पदवीधर भारतात असून त्यांची संख्या तब्बल ११३ मिलियन इतकी आहे. २५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले आणि पदवी किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची भारतातील संख्या १०० मिलियन इतकी आहे.
कोणत्या देशात किती पदवीधर ?
भारत -११३ मिलियन, अमेरिका ९३ मिलियन, चीन ७९ मिलियन, रशिया मिलियन, जपान २५ मिलियन, जर्मनी मिलियन, ब्रिटन १८ मिलियन, १९ इंडोनेशिया १६ मिलियन, दक्षिण कोरिया १५ मिलियन, मेक्सिको १३ मिलियन ४३ सोमवारी प्रसिद्ध झालेल्या या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, २.६८ लाख भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतले आहे.
अमेरिकेतही भारतीय अव्वल
ओपन डूअर्स रिपोर्टही प्रसिद्ध झाला असून, त्यात आंतरराष्ट्रीय पदवी मिळवण्यात भारतीयांची संख्या वाढली आहे. अमेरिकेतून पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चीन पहिल्या क्रमांकावर होता. भारताने याबाबतीतही चीनला मागे टाकले आहे. अमेरिकेतून पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या भारतीयांची संख्या ६३ टक्क्यांनी वाढली आहे. २०२२-२३ या वर्षात १.६५ लाख भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील विद्यापीठातून पदवी घेतली. तर १.२६ लाख चिनी विद्यार्थ्यांनी पदवी घेतली.
