श्रीपुर ता माळशिरस – येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये पाँवरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. कारखान्याचे चेअरमन मा. आ. प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदशनाखाली कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे व कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणामुळे निसर्गाचा समतोल राहील, असे यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे यांनी सांगितले. कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकणों यांनी कार्यक्रमाबाबत माहिती दिली. ५ जून हा दिवस प्रत्येक वर्षी पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे हा पर्यावरण दिनाचा मुख्य हेतू असतो. कारखान्याने आजपर्यंत सुमारे २५ हजार वृक्षांची लागवड केली असून सदरचे वृक्ष अत्यंत चांगल्या प्रकारे जोपासले आहेत. कारखान्याच्या या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने सर्वश्रेष्ठ ‘वनश्री पुरस्काराने’ कारखान्यास सन्मानीत केले आहे. यावर्षी पाऊस लवकर सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्याची योग्य प्रकारे जोपासना करणेचे नियोजन कारखान्याने केले असून यामध्ये वड, आंवा, चिंच, ना रळ, पिंपळ इ. वृक्षांचा समावेश आहे. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, प्रोडक्शन मॅनेजर एम. आर. कुलकर्णी, केन मॅनेजर एस.सी. कुमठेकर, चीफ अकौंटंट, आर.एम. काकडे, चिफ इंजि ए.डी. बारटक्के, को-जन मॅनेजर एस. एस. विभुते, डिस्टीलरी मॅनेजर आर. एस. पाटील, ऊस विकास अधिकारी एस.पी. भालेकर, संगणक प्रमुख टी. एस. भोसले, कार्यालयीन अधिक्षक बी.एस. बाबर, मटेरियल मॅनेजर एम. जे. देशपांडे, इन्स्ट्रूमेंट मॅनेजर समीर सय्यद, सिव्हील इंजिनिअर एच. एस. नागणे, हेड टा. कीपर एम.एन. कदम, इस्टेट मॅनेजर आर.डी. गाजरे, पर्यावरण अधिकारी एस.ए. ताम्हाणे, इत्यादी उपस्थित होते.
