पंढरपूर : भागवत एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविकांनी शनिवारी गर्दी केले होते. भागवत एकादशीला विशेष महत्त्व असल्याने अंदाजे एक ते दीड लाख भाविक पंढरीत दाखल झाले होते.चंद्रभागा नदीपात्रात मुबलक पाणी असल्यामुळे भाविकांनी स्नानाचा आनंद लुटला. पंढरीत आलेले भाविक प्रथम स्नान करण्यासाठी चंद्रभागेत गर्दी करत होते. स्नानानंतर पदस्पर्श दर्शन तसेच मुखदर्शन व कळसदर्शन घेण्यास भाविकांनी प्राधान्य दिले. पदस्पर्श दर्शन रांग सारडाभवनपर्यंत पोहोचली होती. यामुळे भाविकांना पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी उशीर लागत लाखांवर भाविकांनी घेतले विठूरायांचे दर्शन होता. तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना सुलभव जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने दर्शन व्यवस्था केली होती. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन झाल्यानंतर नगर प्रदक्षिणा करण्यास भाविकांनी पसंती दिली होती.शहरातील पार्किंगच्या ठिकाणी भाविकांच्या गाड्यांचे गर्दी झाली होती. त्याचबरोबर मंदिर परिसरदेखील भाविकांनी गर्दीने गजबजून गेलेला दिसून आला. भाविकांच्या वर्दळीमुळे मंदिर परिसरातील कुंकू बुक्का, तुळशीच्या माळा, फूलविक्रेते, वेगवेगळ्या धातूच्या मूर्ती, फोटो फ्रेम आदी प्रासादिक वस्तूंबरोबरच घोंगडी तसेच लहान मुलांच्या खेळण्याच्या दुकानांमध्ये भाविकांची खरेदी झाल्याचे दिसून आले.
