केद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात सध्या कोरोना विषाणूचे ६,१३३ सक्रिय रुग्ण आहेत, पार ६,२३७ रुग्णांनी संसर्गावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत देशात ६ जणांचा मृत्यू झाल्याची नांद झाली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे एकूण ६१ मृत्यू झाले आहेत. एकटवा दिल्लीमध्येच वावर्षी आतापर्यंत ७ जणांनी प्राण गमावले आहेत. रविवारी सकाळपर्यंत देशात ५,७५५ सक्रिय रुगण होते आणि ५,४८४ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.
