आता इंटरनेटशिवाय मोबाइलवर थेट टीव्ही आणि व्हिडिओ पाहण्याची सुविधा मिळणार आहे! डायरेक्ट-टू-मोबाइल या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे लवकरच संपूर्ण भारतात एक नवी डिजिटल क्रांती घडणार आहे. क्क्ळ कानपूर आणि तेजस नेटवर्क्स यांनी विकसित केलेल्या या प्रणालीमुळे, इंटरनेट किंवा सिमशिवाय देखील तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर लाईव्ह टीव्ही, व्हिडिओ कंटेंट, शैक्षणिक कार्यक्रम आणि अत्यावश्यक सरका री सूचना सहज पाहू शकाल. ग्रामीण भागातील कोट्यवधी लोकांसाठी ही एक अभूतपूर्व सुविधा ठरणार आहे.भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याच्या अंतिम टप्प्यात असलेलं हे तंत्रज्ञान सार्वजनिक वापरासाठी सज्ज झालं आहे. या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झालेल्या असून, आवश्यक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरही तयार आहे. विशेषतः अशा ठिकाणी जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी आहे किंवा महागडी आहे, तिथे डीटूएम सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल. यामुळे देशातील डिजिटल डिव्हाइड मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
डीटूएम ही प्रणाली पारंपरिक जमिनीवरच्या टीव्ही ब्रॉडकास्टिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. जसं रेडिओवर गाणी ऐकण्यासाठी कोणत्याही इंटरनेटची गरज लागत नाही, तसंच ‘डीटूएम’ च्या मदतीने स्मार्टफोनवर थेट प्रसारण केलं जातं. हे तंत्रज्ञान रछ3000 नावाच्या विशेष चिपवर कार्यरत आहे, जी तेजस नेटवर्क्सची संलग्न संस्था ‘सांख्या लॅब्स’ने तयार केली आहे. या चिपमुळे स्मार्टफोनमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सीवरून थेट टीव्ही, व्हिडिओ किंवा मजकूर संदेश मिळू शकतात. त्यामुळे कुठेही डेटा प्लॅन किंवा वाय-फाय न वापरता, तुम्ही माहिती आणि मनोरंजनाचा लाभघेऊ शकता. या तंत्रज्ञानात अमेरिकेतील सिंक्लेअर इंक. कंपनीने देखील महत्त्वाची गुंतवणूक केली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अळरउ 3.0 ब्रॉडकास्ट स्टँडर्डवर आधारित सिस्टीम तयार करण्यात आली आहे.
