पंढरपूर – आषाढी यात्रा तोंडावर आली असताना शनिवारी ऐन भागवत एकादशी दिवशी पंढरीत चक्काजाम पहावयास मिळाला. पंढरीच्या अनेक प्रमुख मार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आषाढी तोंडावर नेटके नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून सोलापूरचे पालकमंत्री कामाला लागले आहे. मात्र पंढरपुरात वाहतूक पोलिसांचे वाहतूकीवर नियंत्रण नसल्याने प्रशासकीय यंत्रणा कुचकामी असल्याचे समोर आले आहे. भूवैकुंठ पंढ री नगरीत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत चालली असताना आषाढीच्या तोंडावर पंढरपूरमध्ये वाहतुकीची समस्या वाढू लागली आहे. पंढरपूरमध्ये वाहतुकीची समस्या गंभीर आहे आणि यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. यात्रेच्या अगोदर वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करणे, नवीन मार्ग विकसित करणे, आणि नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे यांसारख्या उपाययोजना केल्यास वाहतुकीची समस्या कमी होऊ शकते.
