पंढरपूर -पंढरपूर तालुक्यातील विविध ठिकाणी पर्यावरण दिनानिमित्त तालुका पोलिसांनी २५० वृक्षारोपण केले आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वृक्ष लागवडीसंदर्भात पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत वृक्षारोपण करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्यासह सर्व अधिकारी, पोलिस अंमलदार यांनी २५० वेगवेगळ्या जातीची रोपे लावली आहेत.
