नाशिक – संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आषाढी पालखी सोहळा मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीनाथ संस्थानकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे, मंगळवारी दुपारी २ वाजता मोहन महाराज बलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, जयंत महाराज गोसावी यांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे त्र्यंबकेश्वर येवून विधिवत पूजा करून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादुका चांदीच्या रथात तेवण्यात येतील. प्रस्थानानंतर मिरवणुकीनंतर टाळ-मृदंगाच्या गजरात श्रींचे रथातून पंढरपूरकडे प्रस्थान होईल. हा पालखी सोहळा अत्यंत वैभवशाली आणि परंपरेप्रमाणे होणार आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पालखी सोहळ्ळ्यात काही नवीन दिंड्या सहभागी होणार आहेत. चारी मार्गात त्या सहभागी होतील, वारकऱ्यांसाठी लागणाऱ्या पाणी, पालखी तळांवरील निवासाची व्यवस्था, शौचालय आदी मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
