नवीन तंत्रज्ञान उसासह शेती पिकांसाठी उपयुक्त : शरद पवार
पुणे – कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे नवीन तंत्रज्ञान हे उसासह शेतीमधील सर्व पिकांसाठी उपयुक्त असून यामुळे कृषिक्षेत्राचे अर्थशास्त्र बदलणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी फलदायी ठरणारे आहे. त्याचा अधिकाधिक प्रमाणात वापर केला जावा, अशी सूचना जेष्ठ नेते आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली. दरम्यान, बारामती येथील अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापर या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. अपुरा ऊस, हंगामाचा कमी होणारा कालावधी, यासाठीच ऊसाचे उत्पादन वाढण्याची गरज आहे असे नमूद करुन ते म्हणाले, यासाठीच एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यकच आहे, असे ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी बँक प्रशासक विद्याधर अनास्कर, विस्माचे अध्यक्ष वी. बी. ठोंबरे आदी उपस्थित होते. यावेळी इन्स्टिट्यूट आणि ट्रस्ट यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. तसेच माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. परिषदेला राज्याच्या विविध भागांतील साखर कारखाना पदाधिकारी उपस्थित होते. महासंघ अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, ए आय तंत्रज्ञानाचा प्रसार मोठया प्रमाणावर व्हावा यासाठी येत्या ३ आणि ४ जुलै रोजी नवी दिल्ली येथे विविध राज्यातील साखर कारखान्यांची परिषद आयोजित करण्यात येणारं आहे. कारण सध्याच्या विस्माचे अध्यक्ष ठोंबरे यांनी सांगितले की, उसाच्या क्षेत्राच्या विकासासाठी राज्यस्तरावर उस विकास कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. तर प्रशासक अनास्कर म्हणाले की, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहा टक्के दराने आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे तसा निर्णय घेण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, ए आय हे क्रांतिकारी तंत्रज्ञान असून उसाच्याबरोबर अन्य पिकांना फायदा होईल. यामध्ये लागवड ते तोडणीपर्यंतची माहिती मिळणार आहे. याबाबत गेली तीन चार वर्षे प्रयोग केले जात आहेत आणि ते यशस्वी झाले आहेत. याच्या वापरामुळे उसाच्या उत्पादनात अंदाजे ३०ते ४० टक्के वाढ होणे शक्य आहे. तसेच उत्पादनाचा खर्च कमी होणारे आहे. पाणी, खत बचत होणार आहे. असे ते म्हणाले.
शेतीक्षेत्र डिजिटल व्हायला हवे : पवार
शेती उत्पादन वाढण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. यासाठीच एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एआयसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद केवळ उसाच्या पिकासाठी नसून सर्व पिकांसाठी आहे. शेती क्षेत्र हे भविष्यात अधिकाधिक प्रमाणात डिजिटल झाले पाहिजे अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
परिस्थितीत ए आय तंत्रज्ञानाखेरीज अन्य पर्याय नाही.
ऊस उत्पादनवाढीला नक्कीच हातभार लागेल
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविली आहे पण उसाच्या उत्पादनाकडे पुरेशा प्रमाणात लक्ष देण्यात येत नाही. आता नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उसाच्या उत्पादन वाढीला निश्चितच हातभार लागणार आहे. गाळप हंगाम कालावधी वाढण्यास मदत होणार आहे, असे सांगितले.
