सांगोला – महूद ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे गावात दूषित पिवळसर असा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावासह बेघर वस्तींमधील अनेक नागरिकांना जुलाब, पोटदुखीसारखे आजार वाढले आहेत. ग्रामपंचायतीने पाण्यात टीसीएल पावडर टाकून शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य यशवंतराव खबाले यांनी केली आहे. निरा उजवा कालव्यातून सोडलेले तसेच पावसाचे वाहून जाणारे पाणी मोठ्या बंधाऱ्यात साचले आहे. सध्या याच बंधाऱ्यातील साचलेले पिवळसर पाणी थेट पाणीपुरवठ्याच्या विहिरीत येते. विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणी करून घेणे गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीकडून पाण्यात टीसीएल पावडर टाकून निर्जतुकीकरण न करता पाणीपुरवठा टाकीतून थेट नागरिकांना पुरविले जात आहे. पिवळसर पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने गावाला शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी भाग्यश्री बाजारे, सुनीता कांबळे यांनी केली आहे. असलेल्या गावाला दहा लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. कॅनॉलमधून सोडलेले व पावसाच्या पाण्यामुळे दक्षता घेऊन पाण्याचे नमुने तपासणी करून घेणार आहोत. सध्या पाणीपुरवठा टाकीत १ हजार लिटरला सुमारे ७,.५ ग्रॅम टीसीएल पावडर टाकून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातोय.
बाळासाहेब शिंदे -ग्रामविकास अधिकारी, महूद ग्रामपंचायत
