पंढरपूर – गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील भीमा नदी पात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाळू वाहतूक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. १० लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी केली आहे. पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे गोपाळपूर ते मुंडेवाडी रोडवर रात्रीची गस्त करताना पोलिसांना एक वाहन येताना दिसले. त्या वाहनाचा संशय आल्याने पोलिसांनी वाहनास थांबवले असता, त्यामध्ये दीड ब्रास वाळू आढळून आली. यामुळे पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचा एम.एच. १४ जी.एल. ०२०२ या क्रमांकाचे वाहन व ९ हजार रुपये किमतीची दीड ब्रास वाळू जप्त केली आहे. याप्रकरणी देविदास बाळू फुले (वय ३९, रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर) याने भीमा नदीतील वाळू शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय अवैधरीत्या उत्खनन करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी टिप्परमध्ये भरून तिची चोरून वाहतूक करताना मिळून आला आहे. असा त्याच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
