मुंबई – मराठा आरक्षणाच्या वैधतेवर बुधवार दि. ११ जूनपासून हायकोर्टात नव्याने सुनावणी हाणार आहे. राज्य सरकारनं एसईबीसी कायद्याअंतर्गत दिलेल्या १० टक्के मराठा आरक्षणाविरोधातील याचिका दिर्घ काळापासून हायकोर्टात प्रलंबित आहेत. या याचिका लवकर निकाली काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायायलयाने १५ मे रोजी जारी केले होते. उद्या सायंकाळी ५ वाजता या विशेष सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती हायकोर्ट रजिस्ट्रारतर्फ जाहीर करण्यात आली आहे. आरक्षणावर आधारीत मराठा विद्याथ्यांचं प्रवेश त्रिशंकू अवस्थेत आहेत. याची गंभीर दखल घेत वैद्यकीय प्रवेशात १० टक्के मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १५ मे रोजी हायकोर्टाला दिले होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवत मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
