पंढरपूर – पंढरीत दरवर्षीच चार वेळा मोठया वारी भरत असतात. यापूर्वी आलेल्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मोकाट जनावरांना बाहेर सोडून येण्याची कार्यवाही केली जाते. मात्र यंदाची आषाढी वारी जवळ आली असतानाही अजूनही मोकाट जनावरे मोठ्या रहदारीचे रस्त्यांवर चक्क वाहतुकीस अडथळा करत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत नगरपालिका अजूनही बेसावधच असल्याने भाविकांसह स्थानिक लोकांनाही मोठा ञास सहन करावा लागत आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेली अतिक्रमणे आणि शहरात फिरत असलेली मोकाट जनावरे. यांच्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आलेली असते. यामुळे नागरिकांना त्रास कमी होतो. यासा-ठी पंढरपूर नगरपालिकेने लवकरच वरील कार्यवाहीसाठी आपली मोहीम सुरू करावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे. पढरपर नगरपालिकेकडून दरवर्षीच ही मोहीम सुरू करण्यात येतं असते. याबाबत सध्या नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी यांना जुन्या कर्मचारी यांनी सदरची वाब सुचविणे आवश्यक आहे. वरील वाबीसह शहरातील प्रमूख चौक आणि प्रमूख रस्त्याच्या ठिकाणीं बाहेरून आलेल्या भाविकांची सोय व्हावी म्हणून अनेक मुतारी बांधण्यात आलेल्या होत्या. त्या सध्या गायब असल्याचं दिसत आहे. माञ याचं मुताऱ्यांची स्वच्छता करण्याचां ठेका देण्यात येतं असतो. याबाबत नेमकी कायं परिस्थिती आहे. याचाही नवीन मुख्याधिकारी यांना अभ्यास करावा लागणार आहे. यासह अनेक नवनवीन प्रकार उजेडात येत असताना, त्यावर इलाज करण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. सध्या मागील काही वर्षांपासून प्रशासकचे माध्यमातून सर्वच नगरपालिकांचा कारभार पाहिला जात आहे. त्यामुळे नगरसेवकांची ढवळाढवळ सध्या बंद आ-हे. यासाठी खुल्या मनाने वरील प्रकारांची चौकशी करून मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
