पंढरपूर – आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंढरपुरात ठिकठिकाणी विकासकामे, पालख्यांच्या स्वागताची तयारी सुरू असली तरी नागरिकांनी कायम गजबजलेला व व्हीआयपींची वर्दळ असलेला स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग मात्र विविध ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे चर्चेत आहे. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी येणारे व्हीआयपी दाखल होताच प्रत्येक वर्षी प्रशासनाकडून डागडुजीची मोहीम रातोरात राबविली जाते. त्याच धर्तीवर भाविकांसाठीही दक्षिणा मार्गवरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात न भरता संपूर्ण नव्याने डांबरीकरण करण्याची मागणी वारकरी भाविकांमधून केली जात आहे. यापूर्वीही या मार्गाचे बरीकरण करावे, अशी मागणी वारंवार करूनही पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.यात्रा कालावधीत पालख्या दाखल ल्यानंतर प्रशासनाकडून कोरडी खडी टाकून डांबर टाकण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे वारकऱ्यांची समस्या दूर न होता ती खडी इतरत्र विखुरली गेल्याने समस्यांमध्ये भर पडत असल्याचे चित्र आहे. याची दखल प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे संभाजी ब्रिगेडचे संतोष पाडुळे यांनी सांगितले.
