बार्शी तालुक्यातील संगमनेर गावचे व सध्या माढा येथील रहिवासी कुष्ठरोग्यांची सेवा करणारे उत्तरेश्वर फरिद जानराव यांना मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दि.१० जून रोजी मुंबई येथे पार पडला. यावेळी मंत्री संजय राठोड, रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, तसेच प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, लोकसभा सदस्य अरविंद सावंत आदी उपस्थित होते. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्ची करणारे जेष्ठ कुष्ठरोग तंत्रज्ञ यु. एफ. जानराव यांची ओळख राज्यभरात आहे. गेली अनेक वर्षापासून ते आरोग्य सेवेसह चळवळीतून त्यांचे सामाजिक कार्य सुरू आ-हे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सोलापूर जिह्यासह राज्यातून त्यांचे कौतुक होत आहे. यू.एफ. जानराव यांनी शासनाने माझ्या सेवेची दखल घेऊन माझा सन्मान केला. यामध्ये मी माझे मित्र, गुरुजण, आपतेष्ट, कुष्ठरुग्णाचे योगदान आहे, असे सांगितले.
