अहमदाबाद – या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे. अधिकृत माहितीची प्रतीक्षा सुरू आहे.गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना (plane crash) घडली. अहमदाबादच्या मेघानीनगर (Meghaninagar) परिसरात प्रवासी विमान (passenger aircraft) कोसळलं असून रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. एअर इंडियाचं (Air India) हे विमान असल्याचे समजते. घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. सध्या या विमानात किती प्रवासी होते याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानातून प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. विमान अपघाताच्या कारणांबाबतही अद्याप स्पष्टता नाही. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला असून मेघानीनगर ह्या नागरी वस्तीतच हे विमान कोसळलं. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून विमानातून तब्बल 133 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान जिथे क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं दिसून येत आहे, घटनास्थळी बचाव पथक पोहोचलं आहे. मात्र, या दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लंडनला म्हणजे दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानत इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटना पेट घेतला अहमदाबाद विमानतळावरून दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी ह्या विमानानं लंडनच्या दिशेनं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अहमदाबाद विमानतळाबाहेरील मेघानीनगर रहिवाशी परिसरात या विमानाचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर मेघानीनगरचे अंतर अंदाजे 15 किलोमीटर आहे, येथेच हा अपघात झाला आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. अपघातात मोठी जवीतहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एअर इंडियाचे Boeing Dreamliner 787 हे विमान कोसळलं असून या विमानातील प्रवासी क्षमता 300 एवढी आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे. अधिकृत माहितीची प्रतीक्षा सुरू आहे.
अमित शाहांचा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन
विमानत अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली. तसेच, पोलीस आयुक्त, गुजरातच्या गृहमंत्र्यांना देखील अमित शाहांनी फोन केला. केंद्र सरकारकडून विमान दुर्घटनेनंतर सर्वतोपरी मदत व सहकार्याचे आश्वासन अमित शाह यांनी फोनवरुन दिले आहे.
