अकलूज -आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व खा. धैर्यशील दोन्ही बंधूंनी माळशिरस तालुक्यात एमआयडीसी सुरु होण्याबद्दल पाठपुरावा केला होता. अखेर ती मागणी पूर्ण झाली असून येळीव येथे एमआयडीसीबद्दल नोटीफिकेशन काढण्यात आले आहे.
मोहिते- पाटील या मोहिते पाटील बंधूंच्या प्रयत्नांना यश
मोहिते पाटील बंधूंनी माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर, येळीव येथे एमआयडीसी व्हावी म्हणून वारंवार पाठपुरवा केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
अजित पवार, उदय सामंत यांनी माळशिरस तालुक्यात एमआयडीसी मजूर केली. या पुढील टप्पा म्हणजे माळ-शिरस तालुक्यातील येळीव येथे नवीन सुरू होणाऱ्या एमआयडीसी मध्ये महाराष्ट्र सरकारने व एमआयडीसी कार्यालय सोलापूर यांनी सर्व नवीन उद्योजकांना ते प्रोप्रायटर शिप कंपनी, पार्टनरशिप कंपनी असो किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांनी औद्योगीक जमिनीसाठी अर्ज करण्यात यावे म्हणून नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. तालुक्यातील उद्योजकांनी याचा लाभघेण्याचे आवाहन मोहिते-पाटील यांनी केले आहे.