अहमदाबाद – विमानात सव्वा लाख लिटर इंधन असल्याने स्फोटानंतर तापमान अती वाढल्याने कोणालाच वाचवण्याची संधी मिळाली नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.शहा म्हणाले की या घटनेने संपूर्ण देश स्तब्ध आहे असे म्हटले. संपूर्ण देश एकसाथ आणि संवेदनांसह दुर्भाग्यपूर्ण दुर्घटनेत ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. अमित शाह म्हणाले की, भारत सरकार, गुजरात सरकार, भारताचे पंतप्रधान यांच्यावतीने ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. अमित शाह म्हणाले, अपघातानंतर १० मिनिटात भारत सरकारला माहिती मिळाली. तातडीने मी मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहविभागाचे नियंत्रण कक्ष, नागरी उड्डयण मंत्री, नागरी उड्डयण विभाग सर्वांसोबत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन लगेच आला होता, असे अमित शहा यांनी सांगितले. भारत सरकार, गुजरात सरकार आणि सर्व विभाग मदत कार्य आणि बचाव कार्य करत आहेत. या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर होते. यापैकी एक प्रवाशी वाचल्याची माहिती समोर आली आहे. त्याला भेटून आलो आहे. मृत्यूंची संख्या डीएनए परिक्षण आणि प्रवाशांची ओळख पटवल्यानंतर प्रशासन अधिकृतपणे जाहीर करेल, अशी माहिती देखील अमित शहा यांनी दिली. नागरी उड्डूयण विभागाने चौकशी सुरु केली आहे. या विभागाच्या मंत्र्यांनी योग्यप्रकारे चौकशी व्हावी, अशा सूचना केल्या आहेत, असे अमित शाह म्हणाले.
