सोलापूर – गोवा-सोलापूर विमानसेवेमुळे तस्करी वाढेल का ? असे वक्तव्य खासदार प्रणिती शिंदे यांनी केले होते. यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी खासदार शिंदे यांना सतत सकारात्मक विचार करत चला, असा सल्ला दिला.मोदी सरकारला ११ – वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पालकमंत्र्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. विमानसेवेच्या प्रश्नावर – ते म्हणाले, सोलापूर-मुंबई विमानसेवा ऑगस्ट महिन्यात सुरू करण्याचा शब्द विमान राज्यमंत्र्यांनी दिला आहे. ही सेवा चालू होईल. त्यामुळे नवे उद्योग आणि व्यापार वाढीला मदत होईल. – विमानतळाचे काम झाल्यानंतर काही – शंका कुशंका उपस्थित होते. मात्र, जो संकल्प केला होता त्यानुसार विमानसेवा शरद पवार यांचे नाव न घेता टीका केंद्रीय रस्ते वाहतूक नितीन गडकरी यांनी पंढरपूरसाठी पालखी मार्गाचे काम केले. आजवर अनेक राजकीय जाणते राजे होऊन गेले. त्यांना पालखी मार्ग करावा असे वाटले नाही, अशी टीका पालकमंत्री गोरे यांनी केली.
सुरू झाल्याचे पाहायला हवे. सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. चांगल्या गोष्टी घडतील लक्ष ठेवा. शहरातील उड्डाणपुलांबाबत पालकमंत्री म्हणाले, सरकारने नव्याने उड्डाणपुलांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे भूसंपादनाचे कामही लवकरच सुरू होईल. मात्र, या विषयावर आम्ही लोकांशी चर्चा करणार आहोत. यावेळी भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंह केदार, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आदी उपस्थित होते.
