Satara Sant Shrestha Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi health - 1
पंढरपूर – पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि दूरदृष्टीतून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे चरणसेवा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, उपचार आणि ‘चरणसेवा’ करण्यासाठी सुमारे ५ हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा गाभा आहे. या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सज्ज असून, त्यांच्याद्वारे ‘चरणसेवा’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक यांचा समावेश आहे.
