पंढरपूर – राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी आषाढी वारी निमित्त पंढरपुरात आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पंढरपूर आणि परिसरातील आरोग्य यंत्रणाची माहिती जाणून घेतली. दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे, शिवसेनेचे जेष्ठ नेते साईनाथ अभंगराव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
